Pages

Wednesday, July 28, 2010

पारधी

तीन वर्षा पूर्वीची गोष्ट आहे........ मला नोकरीत कायम केल होत. मी साधारण ७ वाजता कामाहून बाहेर आलो. मला तो आनंद साजरा करायचा होता. पण त्या अंमळ वेळी एकही मित्र जागेवर नव्हता. मग मी एका नख्या मित्राच्या घरीच गेलो. माझा हॉटेलमध्ये जायचा प्लान होता. तोही तयार झाला. अर्धा वाटेवर आल्यावर म्हणाला "माझा एक मित्र आहे, तो मुंबईत नवा आहे आणि त्यान होटेल पाहिलही नसेल." मला थोड विचित्र वाटल. मी हो म्हटल्यावर आम्ही तडक त्याच्या घरी गेलो.
कार्यालयात प्रवेश केला तर संपूर्ण अंधार. कार्यालयाच बिल भरल नसल्यामुळे वीज गेली होती. आणि हा हातात अवघा रुपया घेऊन मेणबत्ती आणू की धगधगत्या स्टोसाठी पिन याच विचार करत होता. आम्हाला पाहता ओशाळून गेला. विचारपूस होता होता हा सटकला..... मेणबत्ती आणायला. कार्यालयातल्या अधूक प्रकाशात पाहिलं. तर तेथे वापरण्याजोग काही नव्हत, भिंतीच रंग गेला होता. तुटक कपात आणि दोन खुर्च्या. एक फाटकी ब्याग त्यात वह्या, पुस्तक, कपडे, अंथरून पाघारून, एकाला जगण्यासाठी लागेल ते सर्व काही.....एका कडेला स्टोवर मुग शिजत होते त्याच त्या रात्रीच पौष्टिक आहार (मागील तीन वर्ष रात्री तो तेच घेतो आहे)मित्र ला खूप विचारल हा कोण? कुटचा? कार्यालायात काय करतो? कधी आला? केव्हा जाणार? पण याने कशाचीही दाद दिली नाही. मग मुकाट्याने होटेल गाटल. आणि आम्ही तिघांनी तो आनंद साजरा केला.
आज तो दिवस लक्षात राहिला तो मला नोकरी लागण्यापेक्षा त्याच्याबरोबर ती संध्याकाळ साजरी केली म्हणून.....
नंतर कधीतरी मित्राने त्याची गोष्ट सांगितली. आणि मी एक पुस्तक वाचल त्याची व त्याच्या सारख्याची गोष्ट सविस्तर समाजण्यासाठी........

पुस्तक- पारधी.
ले.- गिरीश प्रभुणे

पुस्तकाबद्द्ल बरच काही लिहणार होतो.
पण आता काही आठवतच नाही. लक्षात राहिल ते प्रभून्याच मनोगत, त्याच्या सारख्या असंख्य कार्याकात्याच्या धडपडी,
एक शाळा, एक वसाहतीगृह, एक समाज याच्यासाठी घेतलेली अपार मेहनत, जिद्द
त्या असंख्या पारध्याच्या कहाण्या.........

आज आपण कोणत्या युगात जगतो आहोत. आणि हा पारधी समाज कोणत्या परिस्थितीत आहे? समजण्यासाठी......

No comments:

Post a Comment