Pages

Monday, July 26, 2010

पूर्वांचल

हे पुस्तक मित्रांने अनपेक्षितपणे दिल्यावर मला काय आठवल असेल ........................................... “चक दे इंडिया” दोन तरुणी reservation counterकडे येत असताना त्यांना काही तरुण चिडवतात, का तर त्याच्या cheniase, nepali looks वरून, तर दुसरीकडे counterवाला त्यांना त्या भारतात पाहुण्या म्हणून आल्याबद्दल शुभेच्या देतो. त्यावर त्याच उत्तर असत, “आपल्याच देशात, पाहुणा म्हणून घेण्यास कोणाला आवडेल.”
या पुस्तकाचे वाचन करत गेले आणि आपल्याला एकंदरीत पूर्वांचल, त्याची संस्कृती ,इतिहास, भूगोल भाषा,.............याबाबत किती “ज्ञान” आहे याची जाणीव होत गेली. “असम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, व मेघालय या सात राज्याची सांस्कृतिक सफर” अस पुस्तकाच subtitle असल तरी ते बदलून “तुमच्या अज्ञानाची सफर” अस असायला हरकत नव्हती.
ह्य राज्याचा संस्कृतीक, भोंगोलिक, इतिहास माहित असण्याची शक्यता आपल्याला नसते पण या सात राज्याची नाव जरी न अडखाळता सांगता आली तरी खूप, अशी आपली स्थिती आहे. अमेरिका, ब्रिटन येथील उपनगराची नावं आपल्याला जवळची वाटतात पण या भारताच्याच राज्यानं/शहारानं बद्दल आपल असं का व्हाव याबद्दल मला सारखसारख आश्चर्य वाटत आल आहे.
आता या पुस्तक बद्दल थोडस, पुस्तक प्रचंड फार वाचनीय झाल आहे. खर म्हणजे फार informative आणि कंटाळवाण नाही. लेखकाने म्हटल्या प्रमाणे ते प्रवासवर्णन नाही, ते आत्मकथन आहे. पूर्वांचलंच्या इतिहास, भूगोल, संस्कृती, अर्थकारण, समस्या बद्दल (जे आपाल्याला माहित नसल्याने) असल्याने फारच रोचंक झाले आहे.
ब्रम्हपुत्रा नदी नसून नद आहे (म्हणजे काय ते पुस्तकात वाचा) आणि भारत एकूण तीन नद आहेत किंवा या नदात तयार झालेल माजुली (असम) हे गावं, जगातील सर्वात मोठ निवासी बेट आहे. किंवा पूर्वांचलातील ब्राम्हण मंडळी अगदी सरसकट मासे खातात.(त्यांच्या लग्न, मुंज इत्यादी.... सभारंभात मांसाहारी पदार्थ असतात) असमचा आपण आसाम असा उल्लेख करतो किंवा मणिपूरची भाषा मणिपूरी नाही तो फक्त नृत्याचा प्रकार आहे. किंवा त्याचे कपडे, भाषा, जेवण, घराची रचना, प्रचंड वेगळी का आहे? किंवा काही राज्यात मातृसत्ताक पद्धती आहे.(मुलगे लग्न झाल्यावर सासरी जातात वगेरे) किंवा तेथील एका देवळाचे ३९ पिढ्यांन पासून पुजारी देशमुख या आडनावाचे आहेत. इत पर्यन्त रोचंक माहिती मिळेल. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आणि त्या सर्वच interesting आहेत.
इतिहासाच्याबाबतीत म्हणायचं झाल तर फाळणीच्या वेळी भारत सरकारने आणि त्यानंतर आलेल्या वेगवेगळया सरकारांनी ज्या ढीग भर चुका केल्या त्याच पूर्वांचल हे ठळक उदाहरण आहे. सिल्हेत हा जिल्हा (त्याच सामरिक महत्व न ओळखता) पूर्व पाकिस्तानला (बाग्लादेश) आपण भेट म्हणून दिला किंवा त्या परिसरातील एकमेव बंदर आपण पाकिस्तानला आनंण म्हणून दिले. जेथे बहुसंख्येने हिंदू होते त्यांना कोणात्याही परिस्थितीत पाकिस्थानात सामील होण्यात रस नव्हता. किंबहूना १५ ते २० दिवस तेथे तिरंगा फडकत होता. तेथील राजकीय नेते भारतात सामील होण्यासाठी कंठ शोष करत राहिले. याची माहिती पुस्तकात येत रहाते. (पुस्तक वाचताना एक नाविनच विचार मनात येऊन गेला. फाळणीत भारतापासून पूर्व आणी पश्चिम पाकिस्तान वेगळे केले गेले अस आपण म्हणतो, पण म्यानमार, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान कधी आणि केव्हा वेगळे झाले ते कळत नाहींत. किंबहूना ते भारताचा भाग होता अस आपण बोलत देखील नाही.)
आणि आताच्या घडीला सांगायचं तर पुर्वाचालातील अरुणाचल प्रदेशम, नागालँड, मिझोरम या राज्यात जाण्यासाठी आपल्याला परमीट घ्याव लागत. स्वतंत्र भारताच्या या राज्यात जाण्यासाठी तुम्हाला पूर्ण दोन दिवसचा सोपस्कार करावा लागतो, कमाल आहेना. त्रिपुरा सारख्या राज्यात रात्री पाच नंतर public transport बंद होतात किंवा पडतात. तुम्हाला तेथून बाहेर पडण्यासाठी फक्त आणी फक्त सकाळी सहाची बस पकडावी लागते कारण पुढचा सारा प्रवास साधारण १२ ते १४ तासाचा आहे व तेही पूर्णपणे पोलीस संरक्षणात. या आणि इतर अनेक राज्यात तुम्हाला सीमा सुरक्षा दलाच्या अनेक अंगझडतीतून जावं लागत. भूतान, म्यानमार, चीन, व बाग्लादेश या देशाच्या अंतरराष्टीय सीमा तुम्हाला मुक्तपणे CROSS करताना तेथील स्थानिक रहिवासी दिसतील आणि त्याच वेळी वृत्तपत्त्रातून ”या देशातून भारतात घुसघोरी होत नाही.“ अस सांगाताना आपले कॉगेर्सी मंत्री आठवतील.
पालीस्तानी अरब किंवा काश्मिरी निर्वासितनबद्दल आपण किमान ऐकून तरी असतो पण पूर्वांचलातील ६० वर्षापासून असलेल्या बाग्लादेशी, म्यानमार निर्वासिताच्या छावन्या बद्दल आणि त्याचा समस्या बद्दल न आपल्याला ऐकून आणि वाचनहि माहिती नसते. तेथील बेकारी, हिंदी भाषिकशी होणारे दंगे किंवा नागा, बोडो यांची स्वतंत्र राज्या मागण्या बद्दल आपण ऐकून असतो पण राष्ट्रीयएकात्मतेवर घाला घालणाऱ्या ख्रिश्चन धर्मातारणावर मला येथे नव्यानेच कळले. धर्मातारणाने राष्ट्रीय एकात्मता कशी भंग होते हे जाणून घेयाची इच्छा असेल तर पुस्तक जरूर वाचा.
या भागामध्ये खिश्चन मिशानार्यांचा धर्मप्रचार नी धर्मप्रसार पूर्ण ताकदीनिशी चालू आसतो. त्याचा प्रचार आणि प्रसार शाळा नी रुगानालय ह्या दोन माध्यमातून चालू असतो, त्यामुळे ते थेटघरात पोहोचतात. त्याच्या अथक प्रयान्ताना तसं “थोडंफार” यश मिळतही असत. २००० साली मिझोरम सरकारने संपूर्ण मिझोरम ख्रिश्चन झाल्याचा उत्सव साजरा केला. नागा, बोडो या MAJOR जाती सोडल्यास इतर अनेक जाती पूर्णपणे ख्रिश्चन झाल्या आहेत. हे आदिवासी आपली संस्कृती विसरत चालले आहेत. प. बंगालवरून या राज्यात जाण्यासाठी जी ४०किमी रूंदीची पट्टी शिल्लक आहे त्यात बाग्लादेशी मुस्लीमाची लोक्संख्या झपाट्याने वाढळी आहे. या राज्यात बांगलादेशी घुसघोराची लोकसंख्या २०%पेशा जास्त आहे. आणि हि बाब दुर्लाश्न्याजोगी नाही पण हि परिस्थिती हळूहळू का होईना बदलत आहे या संधार्भात RSS आणि संघ परिवारच्या चांगल्या कामाची माहिती पुस्तकात आली आहे. पण खिश्चन मिशानार्यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी पुढे या भारतीय NGO’S कूठ पर्यत टिकणार?
अशा परिस्थितीत आपल्याला काय करता येईल ? या प्रश्नच उत्तर लेखकाने वेळोवेळी दिल आहे (अगदी कृतीतूनही) तिथल्या सामान्य माणसाला आपल्या कथाकथीत Mainstream जवळ आणता येईल. आपण आपल्या “व्यस्त जीवनातून” तिकडे पूर्ण वेळ जावं आणि तेथील NGO’S ना मदत करावी अस् मी तरी म्हणणार नाही. पण निदान प्रत्येकाने एकदा प्रवासी म्हणून शक्य नसेल, तर निदान पर्यटक म्हणून तरी पुर्वाचालात जाऊन याव, तेही एक कार्यच आहे. (तेथील परिस्थिती स्व:त पाहावी, cameraत उतरवावी व मित्रपरिवाराला दाखवावी) एवढी आणि एवढीच माफक अपेशा या पुस्तकातून लेखकाने अपेक्षिली आहे
येत्या वर्षात ती मी पूर्ण करेन एवढ वचन मी स्व:तला दिलंय.........

No comments:

Post a Comment