Pages

Monday, July 26, 2010

सारे प्रवासी घडीचे............

जयवंत दलावीचे हे पुस्तक माझ्यासाठी पर्वणीच.......
म्हाताऱ्या कुत्र्यावर काठी मारली की, तो जसा हेल काढीत केकाटतो. तसा जीवा आलाप मारायचा. किवां कुल्यावर पानी घाल म्हटला, तर पानी घाल. लोंबत काय म्हणून विचारू नको. समजला? असे मनाला “निखळ” आनंद देणारे आणि तेवढीच हुरहूर लावणारे अनेक किस्से या पुस्तकात आहेत आणि परत वाचतानाही फार मजा आली. पण रागहि तेवढाच आला कारण शेवटची ओळ “सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत”.
गाव, शाळा, नरू, बागईत, अमृते, पावटे सर, वामन दाजी आणि इतर शेजारी, आबा, बाबुळी आणि शांतानाव्ही प्रकरण, रवळनाथाचे देऊळ, दशावतारी आणि इतर अनेक पात्रे अशी हुबेहूब आली आहेत की कोकणातल्या कोणत्या ही गावाचे वर्णन असेच असेल याचे प्रत्यय येत गेले. हे पुस्तक पुलाच्या पुस्तकासारखे hit का झाले नाही याचे नवल वाटते. मला या पुस्तकाचे इतके कोतुक अशासाठी की मी पक्का कोकणी आहे आणि शेवटच्या एक दोन पानात आलेल कोकणाचे सार अनुभावातो आहे. माझ्या बालपणीच्या कितेक सुट्ट्या मी स्मरू शकलो याबद्दल दळवीचा आभारी राहीन.
कोकणाच्या आणि कोकणी माणसाच्या एकूण परिस्थितीत कालानुरूप तीळमात्रही फरक पडला नाही याचा खेद वाटत राहतो.
आणि हो मुंबईच्या धुमश्चक्रीत राहिलो तेथे परका आणि आता स्वताच्या जन्मस्थळी सुध्दा परका हे दळवी चा वाक्य मला तंतोतात लागू पडत.

No comments:

Post a Comment