Pages

Monday, July 26, 2010

काश्मीर- धुमसते बर्फ

पुस्तक तसं जुनंच आहे.
पुस्तकाचा विषयही तसा जुनंच आहे.
पण यात आज माडलेली समस्या आजही तशीच आहे. (तशा अनेक समस्या आजही कायम आहेत.)
पण मी बोलतोय मागील सात दिवस धुमसणाऱ्या काश्मीर बद्दल..........
“काश्मीर धगधगते आहे. नंदनवनातले चिनार पुन्हा होरपळले आहेत. निसर्गरम्य प्रदेशात दगडफेक विरुद्ध गोळीबार असा अपरिहार्य संघर्ष पेटला आहे. रडणं, विलापणं आणि नीरव रात्रींना चिरत जाणारे आक्रंदन, मुलांचा आणि मातांचा आक्रोश, पुन्हा सुरू झालाय. थिजलेल्या रात्रीवर विलापणाऱ्या ताऱ्यांचा मुकुट आहे तर चंदासह अवघे तारांगण इथे दु:खात भिजले आहे. गेल्या काही वर्षांत असे वाटत होते की बंदुकी आणि संगिनींच्या छायेत वावरणारे श्रीनगर खोरे आता शांत झाले असावे. महिनाभरातल्या घटनांनी मात्र नंदनवनाच्या शांततेला पुन्हा ग्रहण लागले आहे. “
हि बातमी ५ जून च्या म. टा. आली, सर्वात आधी आठवल ते हे पुस्तक
काश्मीर समस्येबाबत सत्य उजेडात आणणारे जम्मू काश्मीरचे राज्यपाल जगमोहन याचे खळबळ जनक पुस्तक
Frozen Turbulence in Kashmir
“वास्तव” या पुस्तकाचे सामर्थ्य आहे भारतीय घडामोडीत (राजकीय इतिहासात) आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवे अस पुस्तक -N.S. jagannath (Indian Review of books)
पुस्तक म्हणण्यापेक्षा मी त्याचा ग्रंथ म्हणूनच उल्लेख करेन. जम्मू काश्मीरवर लिहिलेला शास्त्रशुद्ध प्रबंध. जो वाचता येईल व कळेलही. जम्मू काश्मीर समस्या पुढल्या ५० वर्षात तरी संपणार नाही आणि ती आताही इतकी ज्वलंत आहे की त्या बद्दल कुतूहल न संपणारे. लेखक जम्मू काश्मीरचे राज्यपाल राहिलेले तसे ते, इतरही केंद्रशाक्षित राज्याचे उपराज्यपाल होते. हाडाचे पत्रकार आणि पद्मविभूषणाने सन्मानित. त्यामुळे पुस्तकाच्या सत्यतेवर शंका घेण्याच कारणच नाही आणि इतका base मिळाल्यावर पुस्तक बेस्ट सेलर होणार यावर वादाच नाही. तस ते झालाही. पण त्याच याहून खर कारण त्याचा जिवंत विषय. प्रकाशकाने म्हटल्या प्रमाणे नुसत्या अनुक्रमाणीकेवर नजर टाकली तरी पुस्तकात काय दारू गोळा असेल याचा अंदाज येतो.
वास्तविक पुस्तकाची लेखकाने दोनदा राज्यपाल या नात्याने आलेल्या कारकिर्दीत (२६/४/८४ ते १२/०७/८९ व १९/०१/९० ते १६/०५/९०) अनुभावलेल्या अत्यंत नाटयमय/दुखद राजकीय प्रसंग व प्रश्नांचीची मिमासा केली आहे. ते आपल्या आताच्या दृष्टीने निरर्थक असल तरी पुर्वोतिहास ,३०७व्या कलमाची कुळकथा, जुने प्रश्न : गुंतागुंत नवी , धोक्याचे इशारे , पाळेमुळे आणि इतर अनेक प्रकरणे वाचनिय आहेत. काश्मीर समस्येचा मुळ गाभा समजण्यात त्याचा फार उपयोग झाला. या बाबतीत केंद्र व राज्य सरकार काय ठरवून करू शकते व मुस्लीम मतान वर डोळा ठेऊन काय ठरवून करत नाही याच उत्तर देखील कदाचित मिळेल.
पूर्वाचल बद्दल लिहिताना फाळणीच्या वेळी भारत सरकारने ज्या टीगभर चुका केल्या त्याचं पूर्वाचल हे ठळक उदाहरण असं मी लिहल त्या बद्दल खरच माफ करा कारण यात काश्मीर चा क्रमांक पहीला.
आपल्या उथळ, वरवरचा विचार करणाऱ्या शेख अब्दुल्लासारखा नालायक माणसाचे फाजील लाड पुरवणाऱ्या नेहरू सरकारची कीव करवी तितकी थोडी आणि नंतर येणाऱ्या राज्यकर्त्यांना या परिस्थिती मागे फरफटत नेणारी लाचारी ज्यावर खंबीरपणे उपाय न घेता जवळचा फायदा घेण्याचा व्याभिचारीपणा. याच समग्रदर्शन पुस्तकाच्या पानापानात आल आहे नेहरू सरकारने काश्मीर प्रश्नी जी डोकेदुखी समस्त देशाला दिली त्याची यथार्थ “वाचनीय” कहाणी.

No comments:

Post a Comment